Satyam jewellers: अधिक मासातील चांदीच्या वाणावर मिळवा 25 टक्क्यांची घसघशीत सूट, सत्यम ज्वेलर्सची खास ऑफर

एमपीसी न्यूज – या वर्षी, श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आल्याने श्रावण 59 दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा असणार (Satyam jewellers)  आहे. या अधिक मासानिमित्त सत्यम ज्वेलर्स घेऊन आले आहेत अप्रतिम कारागिरी असलेले चांदीच्या दागिन्यांची असंख्य विविधता. त्याबरोबरच चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आपणांस मिळेल चक्क 25% पर्यंत घसघशीत सूट.

पंचांगानुसार, दर तीन वर्षांतून एकदा एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हिंदू धर्मानुसार, जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी (जल, अग्नि, आकाश, वायू आणि पृथ्वी) बनलेला आहे. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यांसह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच अधिक मासात परम शुद्धतेसाठी गंगास्नान केले जाते. यामुळे व्यक्तीला नवीन ऊर्जा मिळते.

जावई वाण –

आपल्या सणांचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक सणामध्ये नात्यातील ऋणानुबंध आपसूकच दृढ होतात. प्रत्येक सण आपणांस प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पती-पत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महिने आणि उत्सव करत असतात.

अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू-सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना नारायणा समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरुपी जावयाला मुलीचे आई-वडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.

जोडवी बदलण्याचा मुहूर्त –

जोडवी हा सुवासिनीचा अलंकार असून ते पायात घातले जातात.अधिक मासाचे निमित्त साधून दर तीन वर्षांनी जोडवी बदलण्याची रीत आहे. अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवीन जोडवी घेतली जातात आणि नात्यांचे ऋणानुबंध दृढ केले जातात.

तुमच्या या वाणाला व नात्यांना नव्याने उजाळी द्या सत्यम ज्वेलर्स सोबत. खास श्रावण व अधिकमासासाठी सत्यम ज्वेलर्स यांनी चांदीचे विविध दागिने, पूजेचे साहित्य, भांडी अशा विविध वस्तूंची रेलचेल ते ही माफक दरात घेऊन आले आहेत.

सत्यम ज्वेलर्स म्हणजे आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास खऱ्या अर्थाने मिळवणारी पेढी. ग्राहक आम्हांला सत्यम ज्वेलर्सकडे फक्त सोने खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून कधीही बघत नाहीत तर आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात, गोड-सुखी क्षणांत सत्यम ज्वेलर्सला आपला सोबती मानतात आणि आम्हीही ग्राहकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही सत्यम ज्वेलर्सकडे पिढ्यान् पिढयांचा (Satyam jewellers)  आग्राहकवर्ग आहे. 70 वर्षांच्या आजी-आजोबांपासून 25 वर्षांच्या तरुणांपर्यंत सगळ्यांना सत्यम ज्वेलर्स आपलेसे वाटते.

चला तर मग, आपल्या जावयासाठी आणि लेकीसाठी मनसोक्त खरेदी करा सत्यम ज्वेलर्समध्ये आणि नात्यांना दृढ करा !

अधिक माहिती साठी संपर्क

सत्यम ज्वेलर्स –

कोहीनूर आर्केड,मुंबई-पुणे रोड टिळक चौक,

निगडी बसस्टॉपच्या विरुद्ध बाजूलानिगडी

संपर्क क्रमांक 8983088880

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.