Bengaluru : भाजपविरोधी पक्षांची बंगळूरमध्ये बैठक

एमपीसी न्यूज – विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा इथं झाल्यानंतर (Bengaluru) आता बंगळुरुमधील ताज वेस्ट एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधकांनी बैठक आयोजीत केली आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीनंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे.

Satyam jewellers: अधिक मासातील चांदीच्या वाणावर मिळवा 25 टक्क्यांची घसघशीत सूट, सत्यम ज्वेलर्सची खास ऑफर

आज बंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत रवाना झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ते आज सकाळी बंगळुरुला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप विरोधात एकजुट होण्यासाठी विरोधकांची चर्चा सुरु आहे.

विरोधकांची बैठकीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या देखील उपस्थित आहेत. कालच्या पहिल्या दिवशी सोनिया गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, टीएमसी चीफ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नीतीश कुमार, डीएमके प्रमुख आणि तमिळनाडुचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजदचे लालू प्रसाद उपस्थित होते.

याचबरोबर उद्धव ठाकरे, झारखंड मुक्त मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आम आदमी पार्टी प्रमुख दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती हे सर्व नेते उपस्थित (Bengaluru) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.