Pimpri : पिंपरी न्यायालयात जागतिक न्याय दिनानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – जागतिक न्याय दिनानिमित्त सोमवारी (दि. 17) पिंपरी न्यायालयात वृक्षारोपण करण्यात (Pimpri) आले. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ व कार्यकारणी मार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Bengaluru : भाजपविरोधी पक्षांची बंगळूरमध्ये बैठक

पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे, सह न्यायाधीश आर. एम. गिरी, पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे,

ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. अक्षय केदार, ॲड. ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. नितिन पवार तसेच पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने,

माजी अध्यक्ष राजेश पुणेकर, माजी उपाध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड. पूनम राऊत, ॲड. संगीता कुसाळकर, ॲड. सुषमा बोरसे, ॲड. चित्रा फुगे, ॲड. काळभोर, नायर, लोढा व वकील बांधव उपस्थित होते.

बार असोसिएशन तर्फे न्यायाधीश यांचा फुलांच्या कुंड्या देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बहूगुणी असलेल्या कडुनिंबाची झाडे (Pimpri) न्यायालय परिसरात लावण्यात आली.

या वृक्षारोपणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.