Talegaon : ‘किशोर आवारे यांच्या मृत्युपश्चात होणारे आरोप बिनबुडाचे व अन्यायकारक’

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Talegaon) आणि भानू खळदे यांच्यात वितुष्ट आल्याच्या विविध मुद्द्यांबाबत मावळ परिसरात चर्चा सुरु आहेत, मात्र किशोर आवारे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या बाबतीत होणाऱ्या चर्चा आणि आरोप बिनबुडाचे व अन्यायकारक आहेत. त्याबाबत पुरावे असल्यास संबंधितांनी पोलिसांकडे सादर करावेत, त्यातून न्याय मिळेल, अशा भावना किशोर आवारे यांचे समर्थक व जनसेवा विकास समितीचे संघटक योगेश पारगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

पारगे म्हणाले की, “किशोर आवारे यांनी कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीचा ताबा घेतला नाही. त्यामुळे जमिनीचा ताबा घेतल्याने कलहाची ठिणगी पडल्याची चर्चा करणे योग्य नाही.

किशोर आवारे यांच्या हस्तक्षेपामुळे बांधकाम साईट बंद केल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र प्रत्यक्षात आवारे यांनी कुणाचीही बांधकाम साईट बंद केलेली नाही. त्याबाबत पोलिसांचा देखील तपास सुरु आहे.

Pimpri : पिंपरी न्यायालयात जागतिक न्याय दिनानिमित्त वृक्षारोपण

कृष्णा आकार सोसायटी मागील ओढ्या लगत असणाऱ्या ग्रीन झोन बेल्ट मधील काही वृक्ष नगरपरिषदेच्या माध्यमातून तोडण्यात येत असल्याची लिखित तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन देशपांडे यांनी नगरपरिषदेकडे केली होती.

त्याची शहानिशा करण्यासाठी जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी किशोर आवारे यांच्या माध्यमातून त्या सोसायटी परिसरात भेट दिली होती.

या प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या संदर्भातील तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आला होता. त्याबद्दल लिखित तक्रार किशोर आवारे यांनी केलेली नाही.

तसेच किशोर आवारे यांना नगरपरिषदेमध्ये सुनावणीसाठी कधीही बोलावलेले नसल्याचे पारगे म्हणाले.

पारगे पुढे म्हणाले की, “किशोर आवारे यांनी सोमाटणे टोलनाका बंद व्हावा यासाठी जन आंदोलन पुकारले होते. सोमाटणे येथील टोलनाका मावळकर नागरिकांना मोफत व्हावा, एवढाच त्यामागील हेतू होता.

सोमटणे टोल नाका येथील जागा बदलण्यात यावी यासाठी किशोर आवारे प्रयत्न करत होते. कारण सध्याची जागा ही अत्यंत दाट वस्तीची असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या तळेगावकर नागरिकांना भेडसावत होती.

अनेक रुग्णांना या वाहतुकीच्या समस्येमुळे प्राण गमवावे लागले. टोलनाका इतर ठिकाणी हलवावा एवढीच मागणी स्वर्गीय किशोर आवारे यांच्याकडून करण्यात आली होती.

त्यामुळे त्या ठिकाणी सुरू असणारे कुणाचे कॉन्ट्रॅक्ट काढून घ्यावे किंवा कुणालाही आर्थिक झळ पोहचवावी अशी किशोर आवारे यांची कधीही इच्छा नव्हती, कुणाच्याही कॉन्ट्रॅक्टमध्ये हस्तक्षेप टोलनाका संदर्भात किशोर आवारे यांनी केलेला नाही.

खाऊ गल्ली बंद करण्यासाठी देखील किशोर आवारे यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. क्षुल्लक कारणावरून एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती. चर्चेतून देखील मार्ग काढता आला असता, असेही पारगे (Talegaon) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.