Satyam Jewellers : गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सत्यम ज्वेलर्सकडून आनंद लुटा शुभ खरेदीचा!

एमपीसी न्यूज : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू (Satyam Jewellers) साजरे करण्याला अनन्य साधारण महत्व आहे. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे; जो समाजातील बांधिलकी वाढवतो. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि जेव्हा आपण त्यांना हळदी कुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रुप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरीत्या देवीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो.

हळदी कुंकवा बरोबरच सुवासिनींना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते आणि ती भेटवस्तू सुवासिनींच्या आवडीची असेल तर बातच न्यारी!

सत्यम ज्वेलर्स यांनी भारतीय संस्कृतीचा हा अनन्य साधारण महत्व असणारा हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. सत्यम ज्वेलर्सच्या तिन्ही दालनांमध्ये हा समारंभ अत्यंत उत्साहात आणि मनोभावे साजरा करण्यात आला. सुवासिनींना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात आले, सत्यम ज्वेलर्सच्या तिन्ही दालनांमध्ये सुवासिनींचे आदरातिथ्य झाल्यांनतर तिळगुळाचे वाटप करण्यात आले.

Maratha Reservation : मोठी बातमी! मुंबईत दाखल होण्याआधीच मनोज जरांगे यांना कोर्टाची नोटिस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

ह्यानिमित्ताने, सुवासिनींची अत्यंत आवडीची असणारी गोष्ट “वाण” वाटप सुद्धा करण्यात आले. (Satyam Jewellers) यंदा सत्यम ज्वेलर्सने वाण वाटपाच्या निमित्ताने “एक अभिनव वाण” सुद्धा केले, ते म्हणजे रु. 250चे गिफ्ट व्हाऊचर. सुहासिनींनीही अत्यंत प्रेमपूर्वक ह्या वाणाचा स्वीकार केला.

ह्या व्हाउचरच्या निमित्ताने सुवासिनींना फोर्मिंग व इमिटेशन,चांदी, सोने, डायमंड ज्वेलरीच्या खरेदीचा आनंद घेता यावा हा उद्धेश होता. हळदी-कुंकू समारंभास सुवासिनींनी दिलेल्या ह्या उस्त्फुर्त प्रतिसादा बद्दल सत्यम ज्वेलर्स सर्व सुवासिनींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.

उद्या 25 जानेवारीला गुरुपुष्यामृताचा शुभ मुहूर्त आहे. पंचांगानुसार, गुरु पुष्य योग 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:16 वाजता सुरू होईल. पुष्य नक्षत्रावर गुरू आणि शनि यांचे अधिपत्य असते, त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते म्हणूनच ह्या दिवशी रत्ने, सोने-चांदी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस आहे.

सत्यम ज्वेलर्सच्या तिन्ही दालनांमध्ये सोने खरेदीबरोबरच पुष्कराज रत्न खरेदीसाठी उत्साह पहावयास मिळतो. कारण गुरुपुष्यामृत हा पुष्कराज परिधान करण्याचा उत्तम मुहूर्त मानला जातो.

चला तर मग, उद्या 25 जानेवारीच्या शुभ मुहुर्तावर सोने खरेदीचा आनंद घेऊया सत्यम ज्वेलर्स सोबत आणि
समृद्धी घरी आणूया !

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.