Maratha Reservation : मोठी बातमी! मुंबईत दाखल होण्याआधीच मनोज जरांगे यांना कोर्टाची नोटिस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली असताना त्यांच्यावर मुंबई हायकोर्टाने त्यांना नोटिस बजावली आहे. केवळ त्यांनाच नव्हे तर हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस दिली असून ही नोटिस गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर देण्यात आले आहे. मनोज जरांगे यांच्याकडे कोर्टाने नोटिसामार्फत आंदोनाची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा अवधीही दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी जोवर आरक्षण मिळणार नाही तोवर मुंबई सोडणार नसल्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले असून आज त्यांचा मोर्चा पिंपरी चिंचवडमध्ये धडकला आहे. 26 जानेवारी रोजी ते मुंबईत दाखल होणार आहेत. या दरम्यानच आता हायकोर्टाने आधी त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune: काँग्रेसमध्ये मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले स्नेहभोजन रद्द

या सोबतच कोर्टाने राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला एवढ्या मोठा (Maratha Reservation) जनसंख्येची कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार याचे उत्तर मागितले आहे.  यादरम्यान गरज वाटल्यास सदावर्ते यांना पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.