Pune: काँग्रेसमध्ये मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले स्नेहभोजन रद्द

Pune: काँग्रेसमध्ये मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले स्नेहभोजन रद्द
एमपीसी न्यूज – पुणे शहर काँग्रेसमधील वाढती अंतर्गत (Pune)गटबाजी, रुसवे आणि फुगव्यांसह आपापसातील मतभेद आगामी लोकसभा निवडणुकीत घातक ठरण्याची शक्यता असल्याने शहर पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनासाठी आयोजित करण्यात आलेले मंगळवारचे स्नेहभोजन रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने दिली. त्यामुळे काँग्रेसमधील मनोमिलन कागदावरच राहणार असल्याचे दिसत आहे. 
आगामी लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने (Pune)काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पण, काँग्रेसमध्ये दोन गट असून, त्यांच्यातील वाद, मतभेद सातत्याने पुढे आले आहेत. प्रभारी शहराध्यक्ष यांचा एक गट असून, विद्यमान आमदारांचा दुसरा गट आहे.

 

Pune : पुणे लोकसभा काँग्रेसचा उमेदवार 15 फेब्रुवारी नंतर जाहीर होणार – नाना पटोले

काँग्रेसमधील गटातटाच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडेही करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटबाजी धोक्याची ठरण्याची शक्यता असल्याने पटोले यांनी ती रोखण्यासाठी पुढाकार घेत स्नेहभोजन आयोजित करण्याची सूचना माजी मंत्री उल्हास पवार यांना केली होती. त्यानुसार येत्या मंगळवारी (२३ जानेवारी) आयोजित करण्यात आला होता.
मात्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसतर्फे 20 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्यामध्ये आपआपसातच मोठा संघर्ष आहे. त्यामुळे स्नेहभोजनाचे निमित्ताने का होईना ही नेतेमंडळी एकत्र येतील, अशी अपेक्षा प्रदेश नेतृत्वाला होती. मात्र, अशा प्रकारचे स्नेहभोजन रद्द झाल्याची माहिती वरिष्ठ काँग्रेस नेत्याकडून देण्यात आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.