Pune : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – व्यक्ती आणि अभिव्यक्तीचा (Pune) अनोखा मिलाफ असणारा मुक्तछंद या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे 28 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डीईएसचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मिलिंद कांबळे, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमाने उपस्थित होते.
हे महोत्सवाचे 25 वे वर्ष आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी 28 जानेवारी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान 150 विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत.

सोमवारी 29 जानेवारी सकाळी 10 वाजता पद्मजा फेणाणी यांच्या हस्ते मुक्तछंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची मुलाखत होणार आहे.
त्या दिवशी दुपारी 12 वाजता चित्रपटाचे अंतरंग या परिसंवादात हृषिकेश जोशी, सुनील सुकथनकर, अश्विनी गिरी सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता यमनरंग हा लता मंगेशकर स्वर रजनीचा कार्यक्रम सानिया पाटणकर सादर करणार आहेत.

मंगळवारी 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कालातीत शिवकौशल्ये हा अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले असून, दुपारी साडेचार वाजता शब्द सुरांची रसाळ पोथी हा श्रीधर फडके आणि आनंद (Pune) माडगूळकर यांची मुलाखत होणार आहे. संध्याकाळी सात वाजता कवितेच्या वाटेवर हा वैभव जोशी हा कार्यक्रम होणार आहे.

Pimpri : जल्लोष शिक्षणाला विद्यार्थी, शिक्षकांचा प्रतिसाद

बुधवारी 31 जानेवारी सकाळी साडेदहा वाजता नाते कलेशी या कार्यक्रमात शुभांगी गोखले आणि सखी गोखले सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता चर्चा तर होणारच गप्पागोष्टी चा कार्यक्रम आहे उर्मिला निंबाळकर इंद्रजीत मोरे सहभागी होणार आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजता वारसा लोक कलेचा लावण्यवती ही सुरेखा पुणेकर यांची मुलाखत होणारा असून सायंकाळी सात वाजता स्टॅंडर्ड कॉमेडी नाईट चे सादरीकरण सावनी वझे आणि सिद्धांत बेलवलकर करणार आहेत.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांस्कृतिक समितीच्या वतीने पुणे विभागीय शाळा व पुण्याबाहेरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायन स्पर्धा 29 जानेवारी रोजी आयोजित केली आहे. विशेषतः हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत व शास्त्रीय गायनाच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा हे स्पर्धा घेण्यामागील प्रयोजन आहे. या शास्त्रीय संगीताच्या पारितोषिक वितरण समारंभ पंडित हेमंत पेंडसे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डी ई एस सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.