Pune : दोन देशांतील संबंध दृढ करण्यासाठी विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम महत्त्वाचा – डॉ. शरद कुंटे

एमपीसी न्यूज – दोन देशांतील संबंध दृढ करण्यासाठी विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञ डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.फर्ग्युसनच्या जर्मन विभागाला (Pune) 110 वर्षे पूर्ण होण्याच्या आणि महाविद्यालयाच्या भारत  व जर्मनी यांच्यातील 35 व्या विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमात  (Pune)  कुंटे बोलत होते.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (Pune) अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. सविता केळकर, हेल्म्बुंडशूल शाळेच्या समन्वयिका आना हान, मॅक्सम्यूलर भवनच्या संचालिका मार्कुस बीचेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

Inflation : डाळींच्या किमतीत मोठी वाढ, डाळींच्या वाढत्या दरांवर सरकार ठेवणार नियंत्रण

पुढे बोलताना डॉ. शरद कुंटे म्हणाले, अशा उपक्रमांतून दोन देशांतील संबंध सुधारण्यास मदत होते. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि उद्योग विषयक संबंध वाढीस लागतात तसेच नवनवीन गोष्टींची माहिती होती ज्यामुळे दोन्ही देशांच्या विकासाला चालना मिळते. हेल्म्बुंडशूल शाळेच्या समन्वयिका आना हान म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि त्यांच्या करिअरला दिशा मिळण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे.
या उपक्रमातील अनुभवांवर आधारित दोन पुस्तकांचे या वेळी प्रकाशन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.