Pune : महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न

एमपीसी न्यूज- दरवर्षी प्रमाणे यावर्षी  महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान (Pune ) मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत आनंदाने व उत्साहाने स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांच्या सान्निध्यात वेदश्री तपोवन, मोशी येथे दिनांक 2 व  3 रोजी पार पडला.

या दोन दिवसांमध्ये अनेक कार्यक्रम घेतले गेले. पहिल्या दिवशी गुलाब गौरव या ग्रंथाचे पारायण तसेच विजयाताई गोडबोले यांचे भजन संध्या आणि परमपूज्य स्वामीजींचे पाद्यपूजन करण्यात आले व दुसऱ्या दिवशी पहाटे ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन तसेच वेदश्री तपोवन वर स्थापित असलेल्या गिरनारच्या दत्तपादुकांना अभिषेक करण्यात आला.

Pimpri : ‘वन क्लू’ अन् खुनाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात

त्यानंतर वेदश्री तपोवन परिसरात दत्तपादुकांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली व सकाळपासून सुरू असलेल्या  व्यासपूजन हवनाची सांगता पूर्णाहुतीने करण्यात आली . तसेच महर्षि वेदव्यासांचे पूजन स्वामिजींद्वारे तीन तारखेला सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान करण्यात आले आणि स्वामीजींच्या आशीर्वचनाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अशा प्रकारे प्रतिष्ठान द्वारे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. ह्या संपूर्ण उत्सवाचे मुख्य यजमानपद प्राप्त करण्याचे सौभाग्य  प्रकाश पाटील यांना लाभले.याबाबत माहिती राहुल चव्हाण यांनी (Pune ) दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.