Chinchwad : प्रतिभा ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुपौणिमा उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मध्ये (Chinchwad)  गुरुपौणिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.दिपकजी शहा यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला.

आपल्या मार्गदशनात डॉ. शहा यांनी पुरातन काळापासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले पण या सगळ्यात शिक्षकांचे स्थान आजही परमोच्च राहिले आहे. उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे व सर्व विभागाच्या समनव्यिका यांनी सरस्वती पूजन केले.

Pune : महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान मध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न

यानिमित्ताने ‘ एक शिक्षक एक झाड ‘ या उपक्रमाची माहिती प्रा.अर्चना गांगड, प्रा. रघुनाथ ताम्हाणे व प्रा. विजया चौधरी यांनी दिली.

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. वर्षा निगडे आणि प्रा. तृप्ती बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित (Chinchwad)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.