Nigdi : जुना पुणे मुंबई महामार्गावर कंटेनरचा अपघात

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर पवळे उड्डाण पुलाजवळ निगडी येथे कंटेनरचा ( Nigdi ) अपघात झाला. महामार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) पहाटे घडली.

 

पोलीस हवालदार अण्णा कानमोडे यांनी पहाटे सव्वापाच वाजता याबाबत अग्निशमन विभागाला वर्दी दिली. त्यानुसार प्राधिकरण उपकेंद्राचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. कंटेनर (एमएच 46/ केआर 9972) पलटी झाल्याने त्यातील ऑइल रस्त्यावर सांडले. रस्त्यावर सांडलेल्या ऑइल मुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी ऑइलवर माती टाकली.

 

Chinchwad : प्रतिभा ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुपौणिमा उत्साहात साजरी

 

हा कंटेनर पुणे शहराकडून मुंबईच्या दिशेने जात होता. निगडी येथे कंटेनरला अपघात झाला. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला केला.

 

मधुकर पवळे उड्डाणपूल ते भक्ती शक्ती उड्डाणपूल या दरम्यान भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात ( Nigdi ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.