Pune : महिलेने दुबईवरून शरिरात लपवून आणले 20 लाखांचे सोने, एक्स रे मशिनमुळे प्रकार उघडकीस

gएमपीसी न्यूज – दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला (Pune) प्रवाशाने तिच्या शरिरात कप्सूल स्वरूपात तब्ब्ल 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने लपवून आणले होते. एक्स रे मशीनच्या तपासणीत हा सारा प्रकार उघडकीस आला. ही कारवाई शनिवारी (दि.1) सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. महिलेने सोन्याची पेस्ट करून त्याच्या कॅप्सूल केल्या होत्या.

Nigdi : जुना पुणे मुंबई महामार्गावर कंटेनरचा अपघात

या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-52 या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

तिने तिच्या शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या गुप्तांगात  423 ग्रॅम 41 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या.या सोन्याची किंमत ही 20 लाख 30 हजार रुपये आहे.  कस्टम विभागाकडून पुढील तपास करण्यात येत (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.