Pune : पावसाच्या रिप-रीपीने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, पवना मध्ये सहा टक्क्यांनी तर खडवासलामध्ये चार टक्क्यांनी वाढ

एमपीसी न्यूज – उशीरा का होईना पण पावसाने जोर धरला असून जुलै (Pune ) महिन्याच्या सुरुवातीला पावासाचा काहीसा जोर हा वाढला आहे. त्यामुळे अगदी कोरडी पडू पाहणारी धरणे आता पुन्हा भरू लागली आहे. मोठी नसली तरी चार दोन टक्क्यांनी धरण परिसरातील पाणी साठ्यात  वाढ होत आहे.

जून महिन्यापासून विचार करायाचा झाला तर पिंपरी-चिंचवड शहाराला पाणी पुरवठा करणारे मुख्य धरण पवना येथे एक जून पासून 488 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणाचा 18 टक्क्यांवर आलेला पाणी साठा हा 24.22 टक्क्यांवर पोहचला आहे.म्हणजे पाणी साठ्यात 6.32 टक्क्यांची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी आजच्या तारखेला हा साठा 16.26 ट क्के होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची पाणी कपातीचे संकट आता लवकरच टळेल अशी चिन्हे आहेत.

Pune : महिलेने दुबईवरून शरिरात लपवून आणले 20 लाखांचे सोने, एक्स रे मशिनमुळे प्रकार उघडकीस

हिच परिस्थिती पुण्याला पाणी पुरवठा कऱणाऱ्या चार धऱणांची आहे. खडकवासला हे धरण जून महिन्यात 40 ते 41 टक्क्यांवर पोहचले होते. 1 जून पासून खडकवासला धरण परिसरात 119 मिमी पावसाची नोंद झाली असून धरणसाठ्यात आजमितीला 45.72 टक्के पाणी साठा आहे.

त्याबरोबरच टेमघर धरणात 1 जून पासून 540 मिमी पावसाची नोंद असून धरणात 8.08 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. वरसगाव धरण परिसरात 1 जून पासून 353 मिमी पावसाची नोंद असून 20.54 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तसेच पानशेत येथेही पाणीसाठ्यात वाढ झाली असून 1 जून पासून  335 मिमी पावसाची नोंद असून धरणात 20.22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

आत्ताचा पाऊस आशादायी असला तरी पुरेसा नाही कारण धरणाची पाणी पातळी 100 टक्के भरण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे. त्यानंतर पुढील वर्षभराचे पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचे पाणी संकट टळणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात पाऊस हा केवळ सरासरीच्या 54 टक्के एवढाच झाला आहे.  पुढील पाच ते सहा दिवसात समाधानकाराक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला (Pune ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.