Maharashtra News : शरद पवार यांच्याशी बोलून राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय – डॉ. अमोल कोल्हे

एम पीसी न्यूज – अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ आमदारांनी (Maharashtra News) मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. या शपथविधी सोहळ्याला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. मात्र आपल्याला या शपथविधी बद्दल कोणतीही कल्पना नव्हती. राजकारणात नैतिकता विश्वासार्हता राहीलेली नाही. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या घडामोडी पाहून मन व्यथित होतं असे म्हणत शरद पवार यांच्याशी बोलून राजीनाम्याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले.

रविवारी अजित पवार आणि अन्य आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या गटात गेल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर खासदार कोल्हे यांनी सोमवारी एक ट्विट करत ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी खासदारकीच्या राजीनाम्याबद्दल वक्तव्य केले आहे.

Pune : पावसाच्या रिप-रीपीने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, पवना मध्ये सहा टक्क्यांनी तर खडवासलामध्ये चार टक्क्यांनी वाढ

राजकारणात नैतिकता विश्वासार्हता राहीलेली नाही. सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या घडामोडी पाहून मन व्यथित होतं. मतदारांचा विश्वासघात करण्यापेक्षा खासदारकीचा राजीनामा देऊन सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून राहव अशी मनस्थिती झाली आहे. शरद पवार यांच्यासोबत बोलून राजीनाम्या बाबत अंतिम निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

खासदार कोल्हे म्हणाले, “मी वेगळ्या कामासाठी अजित पवार यांच्याकडे गेलो होतो. तिथे गेल्यावर आपल्याला भाजपाबरोबर जावं लागू शकतं असं कानावर घालण्यात आलं होतं. मात्र, लगेच शपथविधी आहे हे माहिती नव्हतं. शपथविधी कार्यक्रमाला राजभवनात गेले तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितलं होतं. कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. शिरूर मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून देताना एका विचारधारेवर विश्वास ठेवला आहे, असेही ते (Maharashtra News) म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.