Pune : मध्य रेल्वेने तीन महिन्यात फुकट्यांकडून केला 94 कोटींचा दंड वसूल

एमपीसी न्यूज –  मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रेल्वे (Pune) प्रशासनाने एप्रिल ते जून 2023 य़ा तीन महिन्यांच्या कालावधीत फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून तब्ब्ल 94 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, रेल्वेने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ही दंडवसुली 41.42 टक्के जास्त आहे.

विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. विनातिकीट प्रवास आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबविली जाते. एप्रिल ते जून कालावधीत अशी मोहिमांतून मध्य रेल्वेने 94.4 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Maharashtra News : शरद पवार यांच्याशी बोलून राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय – डॉ. अमोल कोल्हे

जून महिन्यात विनातिकीट, अनियमित प्रवासाची आणि नोंदणी न केलेल्या सामानाची एकूण 13 लाख 39 हजार प्रकरणे आढळून आली. तिकीट तपासणीच्या 1 लाख 10 हजार प्रकरणांमधून 27 कोटी 70 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची तिकीट घेऊन आणि सामानाची नोंदणी करून रेल्वे प्रवास करावा, असे (Pune) आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.