Pune : पुण्याचे किमान तापमान 12 अंशावर, पुढील चार दिवस थंडीचे

एमपीसी न्यूज – ऑक्टोबर हिट नंतर आता हिवाळ्याची (Pune)चाहूल लागली आहे. त्यानुसार पुणे शहर व आसपासच्या परिसरातील किमान तापमानाच कमालीची घट झाली असून किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस वर आले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी हवेमध्ये गारठा जाणवत आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील चार दिवस किमान तापमान हे 17 अंशाच्या खालीच राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार (Pune)शिवाजीनगर मध्ये 14.4 तर पाषाण मध्ये 12.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस पहाटे गारठा जाणवण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात पुणे आणि परिसरात पहिल्यांदाच किमान तापमान 15 अंशांच्या खाली गेले. पाषाण मध्ये 12.8 हवेलीत 13.4 एनडीएमध्ये 13.9 शिवाजीनगरमध्ये 14.4 आणि लवासामध्ये 15.3 अंश सेल्सिअची नोंद झाली आहे.

Congress: ‘एक व्यक्ती अन् दोन पदे’, थेट प्रदेशाध्यक्षांना पत्र, काँग्रेसमधील वाद काय?

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात माळीणमध्ये 13.1, तळेगावात 13.3 शिरूरमध्ये 15 , बारामती 15.1 राजगुरुनगरमध्ये 15.3, नारायणगावात 15.4 , पुरंदरमध्ये 15.7 आणि आंबेगावात 15.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.त्यामुळे नागरिकांनो थंडीचा आनंद घ्या पण आरोग्य साभांळून, कारण हवामान बदलामुळे आरोग्यावर देखील त्याचे परिणाम होतील.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.