Pune : अतिरिक्त शिक्षक असताना करण्यात आली आणखी भरती – माजी नगरसेवकांचा आरोप

एमपीसी न्यूज – 70 अतिरिक्त शिक्षक  असताना  जिल्हा परिषदेतून 313 इतर भरती ( Pune ) करण्यात आली. यावर माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला असून शिक्षण आयुक्तांकडून अहवाल मागितला आहे तो अद्याप दिला नाही, असे निवेदन त्यांनी  प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महापालिका यांना दिले आहे.

अतिरिक्त शिक्षक भरले असल्यामुळे  उपशिक्षकांतून  व शिक्षकातून घाईघाईने पदोन्नती करून अतिरिक्त संख्या नाही, असा दाखवण्याचा  प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी केला आहे. हे एवढ्यावर थांबले नसून पुढच्या पाच-सहा दिवसांमध्ये  पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त इतर जिल्हा परिषदमधून 10 शिक्षकांची भरती होणार आहे.

Pune : देशातील प्रत्येक व्यक्ती सायबर सुशिक्षित असणे गरजेचे ;सायबर तज्ज्ञांचे मत

 प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग (प्राथमिक) पुणे महापालिका यांना दिलेल्या पत्रात माजी नगरसेवकांनी म्हटले आहे की,  जुन्या तुम्ही न केलेल्या चुका दुरुस्त करण्याच्या घाईमध्ये सहा जुलैचे पत्र तयार केले. आत्ता मार्च महिना चालू आहे जुलै महिन्याचे पत्र तयार करण्याचा उद्देश लक्षात येत  नाही. दिनांक 24  जुलै 2023 रोजी आपल्याकडे उपशिक्षक 70  जागा होत्या हे तुम्हीच पाठविले आहे. मुळात शिक्षकांची भरती ” उपशिक्षक जादा असताना करण्याची गरज नसताना ती केली.

आता त्याची चौकशी सुरू झाल्यानंतर बढत्या देऊन शिक्षक संख्या योग्य आहे, भरती योग्य आहे हे दाखवण्यासाठी ही सगळी घाई चालू आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली पाहिजे, तरीदेखील दहा शिक्षकांना अंतर जिल्हा बदली देण्याचा दबाव ( Pune ) सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.