Pune News : महिला दिनानिमीत्त पुणे महापालिका सेविकांना मिळणार हाफ डे

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महापालिकेने (Pune News ) महिला सेविकांना 8 मार्च रोजी हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहिर केली आहे. महिलांसाठी एक भेट म्हणून पुणे महापालिकेने हा पहिल्यांदाच असा निर्णय घेतला आहे.

 

Maval News : शिवणे येथील मंडल अधिकारी, तलाठी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन

 

 पुणे महापालिकेत वर्ग एक ते तीन मधील महिला कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यांना दुपारी तीन नंतर कामातून सवलत देण्यात येणार आहे. तर वर्ग चारच्या महिला सेविका शहर स्वच्छतेसाठी पहाटेपासून कामावर असतात. त्यामुळे त्यांना सकाळी साडे दहा नंतरच सुट्टी देण्यात आली आहे, असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे.

महापालिकेच्या या निर्णयामुळे महिला सेविका वर्ग मात्र आनंदात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.