Pune News : पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता  

एमपीसी न्यूज –  पं कुमार गंधर्व यांचे सुपुत्र व शिष्य पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप झाला. यावेळी मुकुल शिवपुत्र यांना ( Pune News)  ऐकायला रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला मानवंदना देण्यासाठी नाट्यसंपदा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या  गानसरस्वती महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा समारोप पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने झाला. त्या आधी पं रूपक कुलकर्णी यांच्या बहारदार बासरीवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

 

Pune News : महिला दिनानिमीत्त पुणे महापालिका सेविकांना मिळणार हाफ डे

 

 

महोत्सवाचे हे 9 वे वर्ष असून राजाराम पुलाजवळील डी पी रस्ता येथील केशवबाग या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. किशोरी आमोणकर यांचे सुपुत्र निहार आणि बिभास आमोणकर, महोत्सवाचे आयोजक पं रघुनंदन पणशीकर, अपर्णा पणशीकर, जाई काजळचे राजेश गाडगीळ, फ्लीटगार्ड फिल्ट्रमचे निरंजन किर्लोस्कर आणि बेलवलकर हाउसिंगचे अजित बेलवलकर आदी यावेळी उपस्थित होते.

मुकुल शिवपुत्र यांनी राग शुद्ध कल्याणने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी विलंबित एक तालात  ‘बोल न लागी…’ ही रचना प्रस्तुत केली. यानंतर द्रुत तीन ( Pune News) ताल मध्ये ‘दिल दा मलिक साई…’ ही रचना सादर केली. यानंतर त्यांनी राग बसंत मध्ये ‘का कर हुं रघु’ ही मध्यलय तीन तालातील रचना प्रस्तुत केली.

यांनतर त्यांनी ‘छांड दे गल बाही…’ ही भैरवी प्रस्तुत केली. त्यांना सुनील जायफळकर (तबला), राहुल गोळे (संवादिनी), पल्लवी पोटे आणि आदीश्री पोटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.