Dighi Crime News : दिघीत अवघ्या दोन तासात साडे सात लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दिघी येथील साई हॉस्पीटल जवळील ( Dighi Crime News) एका घरात पहाटे दिड ते साडे तीन या कालावधीत घरातून तब्बल साडे सात लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे.

 

याप्रकरणी विकास दौलत आंब्रे (वय 49 रा.दिघी) यांनी  दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Pune News : पं मुकुल शिवपुत्र यांच्या गायनाने गानसरस्वती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता  

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने घराच्या गॅलरीत येवून खिडकीच्या उघड्या दरवाज्यातून घरातील बेडरुमच्या दरवाज्याची कडी उघडली. दरवाज्यातून त्याने बेडरुममध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातून त्याने 7 लाख 24 हजार 836 रुपयांचे 19 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 10 हजार रुपयांचे चांदिचे ( Dighi Crime News) दागिने व रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 7 लाख 49 हजार 836 रुपयांची चोरी करून नेली आहे. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.