Talegaon Dabhade : अक्षरस्पर्श आश्रमाला इनरव्हील क्लबचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज – कात्रजच्या जांभूळवाडी येथील अक्षरस्पर्श दिव्यांग मुलांच्या वसतीगृह व अनाथ आश्रमाला इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने मदतीचा (Talegaon Dabhade) हात देण्यात आला. आश्रमातील महिला रोजगारासाठी जुन्या साड्यांपासून पिशव्या, पर्स, मोबाईल कव्हर बनवतात. त्यांना मदत होण्यासाठी क्लबने 168 साड्या आणि खेळणी दिली.
निराधार स्त्रियांच्या हाताला रोजगार मिळावा व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात म्हणून जुन्या साड्यांच्या वापर करून पिशव्या, पर्स, मोबाईल कव्हर अशा विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी आश्रमाला मदत करण्याबाबत आवाहन केले. त्या नंतर प्रकल्प प्रमुख मीरा बेडेकर यांच्या पुढाकारातून 168 साड्या, त्याच बरोबर या आश्रमातील दीव्यांग मुलांना खेळणी संस्थेच्या संचालिका दीपाली निखळ यांना सुपूर्त केल्या.

या प्रकल्पासाठी सुधा देशपांडे, सुनीता चावरे, चव्हाण मॅडम, मीरा चांदोरकर, अश्विनी दामोदरे, अदिती, शैला, सायली गुंड, सायली गोरे, तसेच क्लब सदस्या अर्चना पिंपलखरे, अल्भा पारेख, शीतल शेटे, संगीता शेडे, ज्योती पाटील, संध्या थोरात, सुलभा मथुरे, सानिका पाटील, साधना भेगडे, वैशाली जामखेडकर, ममता मराठे, साधना काळोखे, संगीता जाधव, भाग्यश्री काळेबाग आदींनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.