Dighi : मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार करणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – मुलाचा वाढदिवस (Dighi) असून त्या कार्यक्रमासाठी भांडी लागत असल्याचे कारण सांगून भांडी घेऊन जात त्याचा अपहार करणारी टोळी दिघी पोलिसांनी पकडली आहे. मागील दोन दिवसात या टोळीवर भोसरी, दिघी, देहूरोड, महाळुंगे एमआयडीसी, चिखली पोलीस अशा प्रकारचे गुन्हे टोळी विरोधात दाखल करण्यात आले आहेत.

विनोद लक्ष्मण सूर्यवंशी उर्फ चैतन्य पांडुरंग चौधर (वय 21, रा. निपानी जळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), तुळशीराम निवृत्ती फुंडे (वय 64, रा. मुटेटाकळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अनिशा देविदास फुंडे (वय 25, रा. मुटेटाकळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील एका मंगल केंद्र दुकानदाराच्या भांड्यांचा अपहार केल्याचा अप्रकार 25 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला. अशाच प्रकारे आणखी काही  (Dighi) दुकानदारांची देखील फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अशा प्रकारे भांडी नेणाऱ्या टोळीचा शोध सुरु केला.

Insurance : जीवन विमा भाग दोन – विमाकर्त्यासाठी विमा उत्पादनांबद्दल जागरूकता महत्त्वाची

दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यामध्ये काहीजण दिसून आले. त्यांची ओळख पटवून त्यांचा माग काढत दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून भांडी, दोन मोबाईल फोन, एक कार, एक दुचाकी असा एकूण 6 लाख 40 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या टोळीने अशाच प्रकारे खेड, महाळुंगे एमआयडीसी, शिरूर, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे मंगल केंद्र चालकांची फसवणूक झाली असल्यास त्याबाबत दिघी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

youtube.com/watch?v=p2J4S5CBwko

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.