Maval : इंद्रायणी डी फार्मसी महाविद्यालयाला राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने (Maval )आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) तळेगाव दाभाडे महाविद्यालयाचे विद्यार्थी ओंकार पोखरकर व सानिका दिघे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.
इंद्रायणी फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी चि.ओंकार पोखरकर (Maval )व कु. सानिका दिघे यांना प्रथम क्रमांक म्हणून (रुपये 15000/ बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र) देऊन सन्मानीत करण्यात आले.
या प्रतियोगीतेचे बक्षीस वितरण समारंभ मा. शाहीद उस्मानी, उपसचिव,महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,विभागीय कार्यालय,पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रा. जी. एस. शिंदे (प्राचार्य, इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, तळेगाव दाभाडे ), प्रा. आर. एन. जाधव (प्राध्यापक, इंद्रायणी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, तळेगाव दाभाडे ), डॉ. एन. एस. व्यवहारे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी पुणे ), डॉ.आशिष चिंबाळकर (विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी,आकुर्डी पुणे ), डॉ. एस. व्ही. देशपांडे (प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, आकुर्डी पुणे ) आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय प्रतियोगीतेमध्ये संपूर्ण राज्यातून जवळपास 40 डी फार्मसी महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
इंद्रायणी डी फार्मसी महाविद्यालयांच्या या दैदीप्यमान मिळालेल्या यशासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष  रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्या व मार्गदर्शिका निरुपा कानिटकर, खजिनदार शैलेश शहा, सर्व विश्वस्त व प्राचार्य प्रा.जी. एस. शिंदे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.