Pune News : माहिती अधिकाराखाली मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीला पोलिसांचा ‘ना’ चा पाढा

एमपीसी न्यूज-  माहिती अधिकाराचा वापर करीत अर्जदाराने चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजबाबत एका ठराविक कालावधीतील माहिती मागितली असता, पोलीस ठाणे प्रशासनाने या माहितीच्या उत्तरा दाखल केवळ मागवलेली माहिती ही अभिलेखात बसत नाही, असे कारण पुढे करीत  उत्तर देणे (Pune News) टाळले आहे.

अर्जदार ललीत सत्यवान ससाणे यांनी माहिती अधिकाराखाली चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती. त्यात त्यांनी पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा योग्य प्रकारे सुरु आहे का, येथे सीसीटीव्ही यंत्रणा चालू असल्यास सीसीटीव्ही फुटेज 12 महिन्यापेक्षा (Pune News) अधिक काळ जतन करुन ठेवले आहे का, सीसीटीव्हीच्या नोंदी ठेवल्या आहेत का, 20 डिसेंबरचे सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही फुटेजबाबत आरोपी व अर्जदार यांनी केलेल्या मागणीच्या प्रती आदी गोष्टींची मागणी केली होती.

Pune News: हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल- मुख्यमंत्री

मात्र या साऱ्या प्रश्नाला उत्तर देताला पोलीस प्रशासनाने अर्जदाराने केलेली माहिती ही अभिलेखावर नाही, अर्जदाराने मागितलेल्या माहिती ही देणे बंधनकारक नाही, कारण कॅमेरे सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात लावण्यात आले आहेत, अशा आशयाची उत्तर देत माहिती देण्यास नकार दिला आहे.

याविषयी बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाणे परिसरात सीसीटीव्ही लावून त्यांचे फुटेज जतन करणेबंधनकारक आहे. त्यानुसार माहिती अधिकाराखाली सीसीटीव्ही फुटेजची अर्जदाराने मागणी केली असता पोलिसांनी ती पुरविणे आवश्यक होते.

अर्जदाराला माहिती न देता सीसीटीव्ही फुटेजबाबत अशी साशंकता ठेवणे हा एक प्रकार (Pune News) न्यायालयाचा अवमान आहे. पुण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त याबबत कोणती कारवाई करतील, याकडे आमचे लक्ष आहे. कारण लोकशाहीत लोकशाहीची यंत्रणा म्हणून काम करत असताना पोलिसांनी संबंधीत माहिती देणे गरजेचे होते, असे मत नाईक यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.