Nigdi News : मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर चे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज –  निगडी येथील मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर यांचे गुरुवारी (दि.19) वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संध्याकाळी पाच वाजता मॉडर्नशैक्षणिक संकुलाच्या( Nigdi News )प्रांगणात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळ पुणे च्या कार्यकारी संपादक शितल पवार तसेच प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट व शाळेच्या माजी विद्यार्थिनी मृणाल पंडीत-भोजकर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपकार्यवाह व शाळा समिती चे अध्यक्ष चित्तरंजन कांबळे हे होते. तसेच कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे आजीव सदस्य राजीव कुटे, नगरसेवक उत्तम केंदळे, कमलताई घोलप, चिखली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते विकासभाऊ साने, पालक संघाच्या उपाध्यक्षा रेणुका पडवेकर,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तुषार कुटे,शिशु विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता घुले,शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुजाता कुलकर्णी,अनिल आढी,गोरोबा शेळके, ए बी पी न्यूज चे नामदेव मेहेर, विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व भालके आदी उपस्थित होते.

Pune News : माहिती अधिकाराखाली मागवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीला पोलिसांचा ‘ना’ चा पाढा

कार्यक्रमाच्या सुरूवातीला माया सूर्यवंशी मॅडम यांच्या मार्गर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविकात( Nigdi News )शाळेचे मुख्याध्यापक पांडूरंग मराडे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या तसेच शाळा अंतर्गत व आंतरशालेय विविध सांस्कृतीक व क्रीडा स्पर्धांमध्ये बक्षीसे मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचे यादी वाचन माधुरी देशमुख यांनी केले. स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रशालेतील इयत्ता पहिली ते चौथी च्या एकुण 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये गणेशवंदना, कोळी गीत,गरबा नृत्य, देवीचा गोंधळ, महाराष्ट्रातील विविध सण,नाट्यछटा, शहीद जवानांच्या जीवनावर आधारित देशभक्ती नृत्य,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य इत्यादी दर्जेदार कार्यक्रमांचा सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. यासर्व नृत्यांमधून इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती वर आधारित सादर केलेल्या नृत्याचा प्रथम क्रमांक आला.नृत्यातील सर्व सहभागी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे कैलास माळी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात( Nigdi News ) आला. सर्व गाण्यांचे निवेदन जोगेश्वरी पैलवान यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा घोलप यांनी केले. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार किरण वारके यांनी केला.  संस्थेचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. गीतांजली रायरीकर यांनी आलेल्या सर्व अतिथिंचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.