Chakan Crime News : महाळुंगे येथील खूनाचा चार तासात उलगडा, किरकोळ कारणावरून झाला खून

एमपीसी न्यूज  – महाळुंगे खूनाचा पोलिसांनी चार तासात उलगडा केला असून मित्राने किरकोळ कारणावरून खून केल्याचे पोलीस तपासात उघड (Chakan Crime News)झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री पावणे बारा वाजता महाळुंगे-आंबेठाण रोडवर एका किराणा दुकानासमोर महाळुंगे येथे घडली.

दीपक काशीराम राठोड (वय 35, रा. वाशीम) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विठ्ठल मंगेश चव्हाण (वय 22, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. अंधबोरी, ता. किनवट, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळकृष्ण पाटोळे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

Nigdi News : मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर चे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी व मयत हे म्हाळुंगे येथे एकत्र रुमवर रहात होते. गुरुवारी रात्री दोघांनी दारु पिली व ते दोघे जेवणासाठी चायनीज सेंटवर गेले. तिथे दोघात किरकोळ कारणावरून वाद झाले. ज्यामध्ये आरोपीने दीपक याला खाली पाडून रस्त्यावरील दगड त्याच्या डोक्यात मारून त्याचा खून केला.

खूनानंतर पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. तिथे आसपासाच्या नागरिकांची चौकशी केल्यानंतर मयताची ओळख पटली. दरम्यार आरोपी हा त्याच्या मूळगावी म्हणजे नांदेडला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केली असता त्याला 24 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पाटील करत आहेत.

 ही कारवाई महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, पोलीस अमंलदार राजू राठोड, विठ्ठल वडेकर, प्रशांत ठोंबरे, संतोष काळे, शिवाजी लोखंडे, शरद खैरे, बाळकृष्ण पाटोळे,  सचिन माने, भाग्यश्री जमदाडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.