Pimpri Crime News : झेरॉक्स व्यवस्थित न आल्याने दुकानात तोडफोड करत दुकानदार महिलेशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज –  झेरॉक्स प्रत व्यवस्थित न आल्याने एका व्यक्तीने दुकानात तोडफोड करून महिलेशी गैरवर्तन करत तिचा (Pimpri Crime News)विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी बारा वाजताच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.

सहदेव मंगलराव टाक (वय 45, रा. काळेवाडी फाटा, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan Crime News : महाळुंगे येथील खूनाचा चार तासात उलगडा, किरकोळ कारणावरून झाला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानातून झेरॉक्स काढली. झेरॉक्स प्रत व्यवस्थित न आल्याने त्याने पैसे न देता फिर्यादीशी हुज्जत घातली. त्यांनतर टेबलवर ठेवलेले प्रिंटर आणि झेरॉक्स मशीन उचलून आपटली. फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग करत आरोपीने (Pimpri Crime News) शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.