Pune News : उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

एमपीसी न्यूज- उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये ( Pune News)  जोरदार बाचाबाची झाली.  आज पुण्यात एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आले होते, त्यावेळी ही घटना घडली.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली.यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

Chinchwad Crime News : पूर्ववैमनस्यातून तिघांना कोयताने मारहाण

पुण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे शहर अध्यक्ष संजय मोरे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शहर प्रमुख नाना भानगिरे यावेळी उपस्थितीत होते.

तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याने काहीच वेळात पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत  परिस्थिती आटोक्यात आणली .घटनास्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिसांचा ( Pune News)  बंदोबस्त करण्यात आला असून पोलिस उपायुक्त देखील या ठिकाणी आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.