Pune : शरद पवारांना धमकी दिल्या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही ( Pune ) दिवसांपूर्वी सोशल मीडिया वरून धमकी देण्यात आली होती. ट्विटरवर केलेल्या एका पोस्ट मधून शरद पवार यांना उद्देशून तुझा लवकरच दाभोलकर होणार अशी धमकी देण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी आता या प्रकरणी कारवाई करत पुण्यातून एका तरुणाला अटक केली आहे. सागर बर्वे (वय 34) असं या तरुणाचं नाव आहे. मुंबई पुणे शाखेच्या पथकाने त्याला रविवारी रात्री अटक केली. अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune : पालखी सोहळ्यादरम्यान  मोबाईल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक

शरद पवार यांना धमकी आल्यानंतर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यानंतर मुंबई पुणे शाखेची पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होती. अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी सागर बर्वे याला अटक केली. सागर बर्वे हा आयटी इंजिनियर आहे. अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने हे पाऊल का उचलले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आयटी इंजिनियर असलेल्या सागर याने दोन फेक अकाउंट तयार केल्याचा ( Pune ) संशय पोलिसांना आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.