AAP : केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आपची निदर्शने

एमपीसी न्यूज – दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या (AAP )  प्रशासनातील अधिकारी नेमणे , बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने निषेध केला. दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

डांगे चौकात झालेल्या आंदोलनात  कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, उपाध्यक्ष संतोष इंगळे, युवा अध्यक्ष रविराज काळे, अनुसूचित जाती आघाडी प्रमुख यशवंत कांबळे, सचिव अमर डोंगरे, प्रवक्ता राज चाकणे, क्रीडा आघाडी प्रमुख चंद्रमणी जावळे, शेतकरी आघाडी प्रमुख वाजिद शेख, साहेबराव देसले, गोविंद माळी, शुभम यादव, प्रकाश हगवणे, अभिजित सूर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, संजय मोरे, स्वप्निल जेवळे, कल्याणी राऊत, दमयंती नेरेकर, सुरेश भिसे, इम्रान खान, ऋषिकेंश कानवटे, दादा सकट   आंदोलनात सहभागी झाले होते.

Pune : शरद पवारांना धमकी दिल्या प्रकरणी एकाला पुण्यातून अटक

आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे आप उपाध्यक्ष संतोष इंगळे यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप (AAP ) आप युवा अध्यक्ष रविराज काळे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.