Pune : पालखी सोहळ्यादरम्यान  मोबाईल चोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पालखी सोहळ्यात (Pune ) भाविकांचे मोबाईल चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सात मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

श्रीकांत राजू जाधव (वय 21) आणि दिलीप बलभीम गायकवाड (वय 33, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात आज (सोमवारी) पालख्यांचे होत आहे. पालखी सोहळ्यात भाविकांकडील मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर दोघेजण मोबाईल चोरीच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली.

Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे तुकाराम महाराज पालखीचे स्वागत

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने हडपसरमधील रविदर्शन परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे सराईत चोरटे असून, त्यांनी हडपसर, मुंढवा, बंडगार्डन, बिबवेवाडी परिसरातून मोबाईल चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपी जाधव याच्याविरुद्ध घरफोडी आणि मोबाईल चोरीचे 24 गुन्हे दाखल आहेत. चोरी केल्यानंतर मोबाईल कर्नाटकात विक्रीसाठी पाठविणार असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक (Pune ) निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.