Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे तुकाराम महाराज पालखीचे स्वागत

एमपीसी न्यूज – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल (Pimpri) भारतीय ब्राह्मण महासंघाने संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले. यामध्ये महिला वर्गाने रांगोळ्या काढून आणि फुगड्या घालून वारकऱ्यांचे स्वागत केले .

वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे ,सचिन बोधनी ,प्रवीण कुरबेट, स्मिता येवलेकर, मकरंद कुलकर्णी ,पूर्वा बारसावडे ,दिलीप कुलकर्णी ,सारंग कुलकर्णी ,सचिन कस्तुरे ,राहुल गोडसे, पराग मुळे ,अजय कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, राहुल कुलकर्णी ,संध्याताई कुलकर्णी ,मंजिरी सहस्त्रबुद्धे व इतर अनेक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pune : जी-20 डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी 50 प्रतिनिधींचे आगमन

प्लास्टिक मुक्त भारत अभियानामध्ये ब्राह्मण महासंघ कायमच अग्रेसर राहिलेला आहे .दरवर्षी ब्राह्मण महासंघ वारकऱ्यांना प्लास्टिक पिशव्या वापरू नका हा संदेश देत असतो. आणि त्यासाठी त्यांना कायम उपयोगात येतील अशा 16 बाय 12 साईजच्या कापडी पिशव्या चे वाटप करण्यात येत असते. याही वर्षी ब्राह्मण महासंघाने पाच हजार वैष्णवांना कापडी पिशव्या वाटण्यात आले.तर इतर सभासदाने वारकऱ्यांसोबत हातात टाळ धरून वारी मध्ये चालण्याचा आनंद (Pimpri) लुटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.