Pune : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेता दिन दिमाखात साजरा

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ( Pune) यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वृत्तपत्र विक्रेता दिन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ ( पुणे – पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने रक्तदान शिबीर राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, सचिव अरुण निवंगुणे ,कार्याध्यक्ष अनंता भिकुले यांच्यासह सर्व विश्वस्त, पदाधिकारी व विक्रेते बंधू-भगिनी उपस्थित होते.  पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे हे देखील उपस्थित होते.

Pune : येत्या 21 व 22 ऑक्टोबर रोजी 7 व्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन

स अध्यक्ष विजय पारगे यांनी सर्व वृत्तपत्र विक्रेते करत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व विक्रेत्यांनी आपल्या स्वास्थ्याची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले.

यावेळी सामाजिक कर्तव्य म्हणून विक्रेता संघाकडून रक्तदान करण्यात आले. या उपक्रमासाठी  यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने रक्तदान शिबीरास सहकार्य केले.

यावेळी 26 लोकांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना संघटनेमार्फत प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात देऊन गौरविण्यात आले.

यावेळी दैनिक पुण्यनगरी, सकाळ, सामना, लोकमत, पुढारी, प्रभात लोकसत्ता, टाइम्स ग्रुप आदी वृत्तपत्राचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंचवड विभागातील सर्व विक्रेत्यांनी विशेष परिश्रम ( Pune) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.