Pune : येत्या 21 व 22 ऑक्टोबर रोजी 7 व्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज : पुण्यातील रायटिंग वंडर्स या संस्थेच्या वतीने (Pune)असेच जगभरातील एक्सक्लुझिव्ह व प्रीमियम ब्रँड्सच्या पेनांचा आंतरराष्ट्रीय पेन महोत्सव येत्या शनिवार 21 आणि रविवार 22 ऑक्टोबर रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.

एरंडवणे, डी पी रस्त्यावर सिद्धी (साज) गार्डन आणि बँक्वेट्स येथे सकाळी 10 ते सायं 8 दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

Alandi : आळंदीतील पद्मावती मातेच्या दर्शनास भाविकांची गर्दी

महोत्सवाचे हे 7 वे वर्ष असून शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता (Pune)राज्याच्या शिक्षण विभागाचे आयुक्त सुरज मांढरे, माजी आमदार डॉ मेधा कुलकर्णी, एमक्युअर फार्मास्युटिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता, मानव हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे, बी यु भंडारी ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश भंडारी, रायटिंग वंडर्स संस्थेचे सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील. या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. यशवंत पिटकर आणि युसुफ मन्सूर यांचे मार्गदर्शन देखील उपस्थितांना लाभणार आहे.

महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, “आपल्या संस्कृतीत साहित्य परंपरेला मोठे महत्त्व आहे. पेन ही वस्तू या परंपरेची वाहक असून पेनाचे जगभरातील अनेकविध ब्रँड्स आणि प्रकार पाहण्याची ही संधी आम्ही खास पुणेकरांसाठी घेऊन येत आहोत. या आंतरराष्ट्रीय महोत्सवात 75 पेक्षा जास्त जागतिक दर्जाचे पेन ब्रँड्स आम्ही प्रदर्शित करणार असून वेगवेगळ्या श्रेणीतील नवीन, विंटेज आणि लिमिटेड एडिशन असलेली अनेक प्रकारची फाउंटन पेन्स, बॉलपेन्स व रोलर पेन्स यामध्ये पुणेकरांना पाहता येतील. याबरोबर विविध प्रकारच्या ब्रँडसच्या रायटिंग नोटबुक्स, पेन पाऊचेस, पेन होल्डर्स व इतर अॅक्सेसरीज देखील महोत्सवात असणार आहेत.”

फाउंटन पेनाच्या नीबवर कोरीवकाम करणारे सुप्रसिध्द कलाकार गौरव कपूर हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे खास आकर्षण असणार असून त्यांची कार्यशाळा उपस्थितांसाठी पर्वणी ठरेल असे सांगत करमचंदानी म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पु.ल. देशपांडे सिग्नेचर पेन, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन, खास लहान मुलांसाठी चिंटू पेन, लॅमी, पायलट, ऑरोरा, अरिस्ता, क्रॉस, बीना, कोंक्लीन, डिप्लोमॅट, क्लिक, पार्कर अशा विविध ब्रँडसचे फाउंटन पेन याबरोबर रोलर पेन, मॅकेनाईज्ड पेन्सिल्स, विशेष रॅडेन आणि अगदी अंड्यांच्या टरफलांपासून बनविलेले पेन देखील पहायला मिळणार आहेत.’’

पेनच्या चाहत्यांसाठी पर्वणी असलेल्या या प्रदर्शनाल जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन देखील यावेळी करमचंदानी यांनी केले.

या दोन दिवसीय महोत्सवादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पुणे अर्बन स्केचर्स, संस्कार भारती यांचे सदस्यही सहभागी होतील. बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून विविध प्रकारे स्वाक्षरी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील.

पेन दुरुस्तीचे प्रात्यक्षिक दाखवणारे पेन डॉक्टर्स महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असेल. प्रदर्शनात लकी ड्रॉच्या माध्यमातून 10 जणांना प्रीमियम पेन भेट म्हणून दिला जाईल. तसेच महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक 25 व्या शालेय विद्यार्थ्याला एक ‘चिंटू’ एक्झाम पॅड भेट दिला जाणार असल्याचेही करमचंदानी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.