Alandi : आळंदीतील पद्मावती मातेच्या दर्शनास भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – शारदीय नवरात्रनिमित्त आळंदी येथील  पद्मावती मातेच्या (Alandi) दर्शनास भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. विशेषतः दर्शनास मोठ्या संख्येने महिला भाविक वर्ग पायी चालत येताना दिसतो.

Pune – पुण्यातील पहिल्या ‘पिकलबॉल’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पद्मावती मातेचे मंदिर व सभामंडप परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. आलेले भाविक पद्मावती मातेस हळदी कुंकू लावून पुष्प ,पुष्पहार,श्रीफळ अर्पण करतात.

भाविकांसाठी येथे लाकडी मंडप उभारून दर्शन बारीची  सोय करण्यात आली आहे. येथील परिसरात तात्पुरत्या स्वरूपात हार,फुलांची दुकाने लागली आहेत.

मंदिरात नवरात्र निमित्त  रात्री धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात.परंपरेप्रमाणे या देवीची सेवा रानवडे कुटुंबायांकडे आहे.

तसेच आळंदीतील शीतळा देवी, लक्ष्मी आई, तुळजाभवानी, बोल्हाई माता व संतोषी मातेचे दर्शन ही या नवरात्रीच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने घेत (Alandi) असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.