Pune : पुण्यातील पासपोर्ट सेवा कार्यालयात सर्व्हरचा बिघाड ; हजारो नागरिकांची गैरसोय

एमपीसी न्यूज – पुण्यातील पासपोर्ट सेवा कार्यालयाच्या ( Pune ) संकेतस्थळात सर्व्हरमधील बिघाडामुळे मागील दोन दिवसांपासून  समस्या येत आहे.   या कार्यालयात दररोज सुमारे एक हजार ते बाराशे जणांच्या पारपत्र अर्जांवर कार्यवाही केली जाते. मात्र, संकेतस्थळातील समस्येमुळे अर्जदारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय होत आहे. पारपत्र कार्यालयाकडून अर्जदारांना याबाबत व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली जात आहे.

 

Maharashtra : शेतकर्‍यांना दिवसा वीज ; पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर….. 2016 च्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग

भारतीय पासपोर्ट कार्यालयाचे संकेतस्थळ आणि माहिती तंत्रज्ञानाशी निगडित पायाभूत सुविधांच्या देखभालीचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून केले जाते. पारपत्र कार्यालयाचे संकेतस्थळ आणि सर्व्हरच्या देखभालीचे काम पुण्यातील विभागीय पारपत्र कार्यालयाकडे नाही.काही अर्जदारांना बुधवारपासून ( दि. 6 ) पारपत्रासाठी अर्ज भरताना संकेतस्थळावर काही अडचणी येत असल्याचे समोर आले. आमच्या केंद्रीय तांत्रिक विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून, लवकरच ही तांत्रिक समस्या दूर होईल, अशी माहिती विभागीय पारपत्र अधिकारी अर्जुन देवरे यांनी ( Pune ) दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.