Pune : मराठा आरक्षणला पाठिंबा,आज पुण्यातील मार्केटयार्ड बंद

एमपीसी न्यूज – सध्या राज्यात मराठ आरक्षणाची मागणी सुरू (Pune) आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज पुण्यातील मार्केटयार्ड बंद राहणार आहे.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन गुलटेकडीच्या वतीने आज एक दिवसीय बंद ठेवण्यात आला आहे.

Alandi : मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हाडे यांचा राजीनामा

सर्व आडते बांधव व बाजार आवारातील सर्व घटक (Pune) या बंद मध्ये सहभागी झाले आहे. सकाळी १० वाजता या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना, टेम्पाे पंचायत, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, आदी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.