Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज – भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ( Pune) ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज ( सोमवार दि .15 जानेवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Pune : गुटख्याने भरलेला ट्रक अन्न आणि औषध प्रशासन विभागाने घेतला ताब्यात; 47 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी (13 जानेवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमेरिकस्थित त्यांची भाची सोमवारी पुण्यात आल्यानंतर अत्रे यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यापूर्वी छत्रपती संभाजी उद्यानासमोरील स्वरमयी गुरुकुल या त्यांच्या निवासस्थानी सकाळी नऊ ते बारा या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरुन वैकुंठ स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा मार्गस्थ होईल, असे डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती यांनी कळविले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.