Pune : शरद मोहोळ खून प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; विठ्ठल शेलारसह अकरा जणांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या ( Pune) गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रविवारी रात्री या प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुंड विठ्ठल शेलार याच्यासह अकरा जणांना ताब्यात घेतले आहे. भविष्याच्या पोलिसांनी रविवारी रात्री पनवेल पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पथक या आरोपींच्या मागावर होते. मात्र आरोपी पोलिसांना हुलकावून देत होते. रविवारी रात्री ते पनवेल ते वाशी यादरम्यान जात असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून या सर्वांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात यापूर्वीच 13 जणांना अटक केली आहे.

Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गँगस्टर शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घराजवळ खून करण्यात आला. त्याच्यासोबत दररोज वावरणाऱ्या सहकाऱ्यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झाल्याने शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरद मोहोळच्या खुनानंतर पुणे शहरात मोठी खळबळ झाली होती. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात मुख्य मारेकऱ्यासह आठ जणांना अटक केली होती. यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. अनेक महिन्यांपासून कट रचून शरद मोहोळचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शरद मोहोळ चा खून करण्यापूर्वी आरोपींनी गोळीबाराचा सराव देखील केल्याचे समोर आले आहे. मुळशी तालुक्यातील हडशी परिसरात दोन वेळा आरोपींनी सराव केला होता. संपूर्ण प्रकरणात आता गुंड विठ्ठल शेलार याचेही नाव आल्याने खळबल उडाली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.