Alandi : मकरसंक्रांतीनिमित्त माऊली मंदिरात महिला भाविकांची मोठी गर्दी

आळंदी:- आज ( दि.15 )  आळंदी येथील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरामध्ये (Alandi) मकरसंक्रांती निमित्ताने पहाटेपासूनच महिला भाविकांनी मोठी गर्दी दिसून येत होती.मकरसंक्राती निमित्ताने दरवर्षी माऊलीं च्या मंदिरामध्ये ओवसा वाहण्यासाठी राज्यातील विविध ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या संख्येने महिला आळंदीला येत असतात.

Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आळंदीतील ग्राम मंदिरात व इंद्रायणी घाटावर सुद्धा महिला भाविकांची गर्दी दिसून येत होती.मकरसंक्रांती निमित्त हलव्याची ,लहान मुलांच्या खेळण्याची तसेच इतर विविध दुकाने चावडी चौक येथील शाळेजवळील परिसरात लागलेली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला (Alandi) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.