Pune : आता महापालिकेच्या प्रयोग शाळांत खासगी रुग्णालयांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी

एमपीसी न्यूज – बाजारात रॅपिड अँटिजेन चाचणी किटचा तुटवडा ( Pune)  निर्माण झाल्याने चाचणी कशी करायची, असा प्रश्न रुग्णालयांसमोर उपस्थित झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालयांना रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून रुग्णालयांना चाचणी केंद्राची यादी पाठविण्यात आली आहे.

Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्यात जेएन.1 चे 250 रुग्ण असून, त्यातील सर्वाधिक 150  रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे किटचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालये त्यांचे रुग्ण करोना चाचणीसाठी पाठवू शकतात, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसमोरील रुग्णांच्या करोना चाचणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या करोना चाचण्या करण्यासाठी पुरेशा प्रमाणात बाजारात किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना महापालिकेच्या चाचणी केंद्रात रुग्णांच्या चाचण्या करण्यास सांगितले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी ( Pune) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.