Pune : उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार वलयांकित तरीही जबाबदारी वाढविणारा – सारंग कुलकर्णी

कुलकर्णी यांना संगीत नाटक अकादमीचा 2023सालचा उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांच्या नावाने (Pune)मिळालेला उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार हा महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

 

सरोदवादनासाठी संपूर्ण देशातून या पुरस्कारासाठी माझी निवड(Pune) झाली आहे ही वलयांकित बाब असली तरी उस्तादजींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा असल्याच्या भावना पुण्यातील युवा, आश्वासक सरोदवादक सारंग कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

सारंग कुलकर्णी यांना नुकताच भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संगीत नाटक अकादमीच्या वतीने संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक कला आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आश्वासक युवा कलाकारांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. नुकताच २०२२- २०२३ साठीचे हे सन्मान जाहीर झाले. संगीत क्षेत्रात शास्त्रीय वादन या विभागात सारंग यांना उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात आले.

लवकरच दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ताम्रपत्र आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २००६ सालापासून संगीत नाटक अकादमीच्या वतीने उस्ताद बिस्मिल्ला खॉं युवा पुरस्कार प्रदान करणात येतात. देशांतील अनेक दिग्गज कलाकारांना या आधी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे हे विशेष.

या वेळी पुढे बोलताना सारंग कुलकर्णी म्हणाले, “जेव्हा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आई- बाबांनी मला फोनवर दिली तेव्हा खरेतर माझा त्यावर विश्वासच बसला नाही. उस्ताद बिस्मिल्ला खॉं या इतक्या मोठ्या कलाकाराच्या नावाने होत असलेला माझा हा सन्मान स्वप्नवत आहे. माझे वडील आणि गुरु पं राजन कुलकर्णी यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो. हा पुरस्कार मला नवी उर्जा देणारा, नवी वाट दाखविणारा आणि नव्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा आहे.”

खरेतर सरोद हे वाद्य थोडेसे कठीण वाद्य आहे. त्याला पडदे नसल्याने या वाद्याला ‘ब्लाईंड इन्स्ट्रूमेंट’ देखील म्हटले जाते. आज या पुरस्काररूपी सन्मानाने सरोद हे वाद्य जास्तीत जास्त रसिकांबरोबरच युवा पिढीपर्यंत पोहोचण्यास नक्की मदत होईल. युवा वादकांनीही हे वाद्य शिकण्यावर भर द्यावा असे, सारंग कुलकर्णी म्हणाले.

सारंग कुलकर्णी यांच्याविषयी –

सारंग कुलकर्णी हे पुण्यातील एक आश्वासक प्रतिभावान सरोदवादक असून कलाकार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. सारंग यांच्या आजोबांचे मोठे बंधू स्वर्गीय पं. रघुनाथराव कुलकर्णी हे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक होते.

 

Maharashtra News : राज्यातील 1446 एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश

तर आजोबा दिवंगत पं. विनायकराव कुलकर्णी हे अमृतसर येथील गांधर्व महाविद्यालयाचे आचार्य आणि प्रसिद्ध संगीतकार होते. सारंग यांचे वडील पं. राजन कुलकर्णी हे प्रसिद्ध सरोदवादक पं रत्नाकर व्यास यांचे शिष्य असून सारंग यांचे संगीताचे शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झाले. ग्वाल्हेर घराण्यातून उदयास आलेल्या पारंपारिक पलुस्कर परंपरांचा पगडा सारंग यांच्या वादनावर आहे. ग्वाल्हेर आणि मैहर घराण्याचा गायकी आणि तंत्रकारी बाज यांचे संतुलन सारंग यांच्या वादनात जाणवते.

सारंग कुलकर्णी यांनी पुण्याच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयामधून त्यांनी विशारद ही पदवी घेतली. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून त्यांना या आधी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

2017साली सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात सारंग यांनी सादरीकरण केले असून तानसेन संगीत समारोह – ग्वाल्हेर, पं कुमार गंधर्व संगीत महोत्सव – देवास, अभिषेकी महोत्सव या देशातील महत्त्वाच्या महोत्सवांसोबतच परदेशात देखील यांचे अनेक कार्यक्रम संपन्न झाले आहेत.

 

अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी सारंग यांनी सरोदवादन केले असून ए आर रेहमान, शंकर एहसान लॉय, अमित त्रिवेदी, तौफिक कुरेशी, लुई बँक्स या कलाकारांसाठी देखील कुलकर्णी यांनी वादन केले आहे. मराठी आणि हिंदीमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियांका बर्वे या सारंग कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.