Pune : सिंहगड रोड परिसरात पार्क केलेली वाहने अज्ञाताने जाळली

एमपीसी न्यूज-सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव खुर्द येथील (Pune ) मीयामी सोसायटीत पार्क केलेली वाहने अज्ञात आरोपीने जाळली. आठ जूनच्या पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी महेंद्र प्रदीप भिरूड (वय 40) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वडगाव खुर्द परिसरात मी आम्ही सोसायटी आहे. या सोसायटीच्या ए टू इमारतीच्या कॉमन पार्किंग मध्ये पार्क केलेल्या तीन दुचाकी आणि एक चार चाकीवर एका अज्ञात आरोपीने ज्वलनशील पदार्थ  टाकून काडेपेटीने आग लावली.यात अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू(Pune )आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.