Pune : जुगारात पैसे हरल्याने गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- गोवा येथे  व्यक्तीला ऑनलाइन जुगार आणि कसीनो जुगार (Pune) खेळण्यासाठी बोलावले. जुगारामध्ये तो जिंकल्यानंतरही त्याला जाऊ न देता पुन्हा खेळण्यास भाग पाडले. यानंतर मात्र जुगारात पैसे हरल्याने निराश झालेल्या त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरी जकात नाका लोहगाव या ठिकाणी 23 मे रोजी हा प्रकार घडला.
विकास शिवाजी टिंगरे (वय 50, रा. विठ्ठल मंदिर जवळ धानोरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अप्रिता दास (वय 35) आणि सुश्मिता दास (वय 33) या दोघीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गेश विकास टिंगरे (वय 21) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे वडील विकास टिंगरे यांना आरोपी महिलांनी वारंवार फोन करून जुगार खेळण्यासाठी गोवा येथे बोलावले. त्यांना ऑनलाइन जुगार आणि कसीनो जुगार खेळण्यासाठी भाग पाडले. यामध्ये ते पैसे जिंकले देखील होते. मात्र पैसे जिंकल्यानंतर त्यांना कॅश आउट होऊ न देता त्यांना पुन्हा जुगार खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर ते जुगारात हरल्याने निराश झाल्याने त्यांनी 23 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी दोन महिलांनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलिस करत (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.