Pune : संजय शिरसाट यांच्या विरोधात तीन रुपयांचाच अब्रूनुकसानीचा दावा का? जाणून घ्या

एमपीसी न्यूज : शिंदे गटाचे आमदार शिरसाट (Pune) यांच्याकडून महिलांविरोधात सतत बेताल वक्तव्य होत आहेत. त्या विरोधात राज्यातील कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा न्यायालयामध्ये करणार आहे, अशी भूमिका ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. संजय शिरसाट यांच्या विरोधात तीन रुपयांचाच अब्रूनुकसानीचा दावा करण्यामागील सुषमा अंधारे यांनी कारण सांगितले आहे.

Chakan : घरफोडी करून दागिने, रोकड, मोबाईल लंपास

त्याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी एक मध्यमवर्गीय असून अब्रू शिवाय दुसर काही जपायला आमच्याकडे नाही. तसेच अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. ती लाखो करोडो रुपयांमध्ये होत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात किंवा स्टंटबाजीमध्ये पडायचे नाही.

पण, मी भटक्या विमुक्तमधून येत आहे. आमच्याकडे एक स्वतंत्र न्यायव्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून तीन रुपयांचा (Pune) दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जात असल्याचे सुषमा अंधारे यांनी यावेळी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.