Pune : पुरवठा साखळी व्यवस्थापनात करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध-डॉ. विराज अत्रे

एमपीसी न्यूज-पुरवठा साखळीचे महत्त्व हे दिवसेंदिवस  (Pune) वाढत असून जागतिकीकरणामुळे पुरवठा साखळी ही केवळ एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यामुळे कित्येकऔद्योगिक संस्थांबाबत असे दिसून  येते की,मालाची खरेदी एका देशात, उत्पादन  साऱ्या देशात तर मार्केटिंग हे सर्व जगामध्ये, यामुळे पुरवठा साखळी  व्यवस्थापनक्षेत्रात  करिअरच्या  नवनवीन संधी मोठ्या प्रमाणात  उपलब्ध झाल्या  आहेत, असे  मत सुप्रसिद्ध कॉर्पोरेट प्रशिक्षक डॉ.विराज अत्रे यांनी  मांडले.काल यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ   मॅनेजमेंट सायन्सच्या वतीने ‘ऑपरेशन्स  व सप्लाय चेन  मॅनेजमेंट क्षेत्रातील  संधी’  या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते  बोलत  होते.

ते पुढे म्हणाले की, ग्राहकाला  एखाद्या  वस्तू खरेदीसाठी  आकारल्या  जाणाऱ्या रक्कमेवर पुरवठा साखळी व्यवस्थापनावर झालेला खर्च हा मोठा परिणाम  करणारा घटक आहे,तसेच आपल्या व्याख्यानात  पुरवठा साखळी  व्यवस्थापनातील मूलभूत बाबींवर सविस्तर चर्चा  केली.या क्षेत्रात दर्जा  नियंत्रण (क्वालिटी  कंट्रोल) व सिक्स  सिग्मा मधील संधींही उपलब्ध असल्याचे त्यांनी  सांगितले. पुरवठा साखळी व्यवस्थापनातील विविध  स्तरातील  बजावण्यात  येणाऱ्या  भूमिका  व जबाबदाऱ्या याबद्दलही अत्रे यांनी विविध उदाहरणांसह सविस्तर विवेचन  केले.

Pune : बहुचर्चित जँगो जेडी 26 मे रोजी होणार प्रदर्शित!

पुरवठा साखळी योग्य पद्धतीने कशी अंमलात आणावी, तिचे व्यवस्थापन कसे करावे व पुरवठा साखळीवर होणारा खर्च कमीत कमी कसा करावा तसेच पुरवठा साखळीची कार्यक्षमता कशी वाढवावी या मुद्द्यांवरही अत्रे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गंगाधर डुकरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वैभव पाटील यांनी केले.या व्याख्यान सत्राला एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.