Pune : भाजप अहमदाबादच नामकरण सावरकरनगर करणार का ? – सुषमा अंधारे 

एमपीसी न्यूज –  आम्ही अनेक शहराच नामकरण करण्याचा (Pune) निर्णय घेतल्याचे विधान नांदेड येथे काल झालेल्या सभेत भाजपचे नेते गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण करतेवेळी केले.पण  आपल्या राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि धारशिव हे नामकरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला.तसेच तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने कायम गौरव यात्रा काढता.त्यामुळे तुम्ही ज्या गुजरात राज्यातून येता,तेथील अहमदाबादच नामकरण सावरकरनगर भाजप करणार का ?असा सवाल उपस्थित करीत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे नेते गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

Chikhali : फ्लॅटच्या उघड्या दरवाजावाटे चार मोबाईल पळवले

   भाजपचे नेते गृहमंत्री अमित शाह यांची काल नांदेड येथे जाहीर सभा झाली.त्यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यावर त्यांनी टीका केली.त्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन चांगलेच(Pune) प्रत्युत्तर दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.