Chikhali : फ्लॅटच्या उघड्या दरवाजावाटे चार मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज – फ्लॅटचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये येऊन 73 हजार रुपये (Chikhali ) किमतीचे चार मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 9) सकाळी पावणे सात ते पावणे आठ या एक तासाच्या कालावधीत सहयोगनगर, तळवडे येथे घडली.

विपुल अधिकराव मोहिते (वय 27, रा. सहयोगनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र सहयोगनगर तळवडे येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहतात. शुक्रवारी सकाळी पावणे सात ते पावणे आठ वाजताच्या कालावधीत त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. फिर्यादी यांचा 15 हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल, त्यांचे रूम पार्टनर प्रतिक पाटील यांचा 35 हजारांचा आयफोन, किरण वाघमारे यांचा 13 हजारांचा सॅमसंग मोबाईल आणि 10 हजारांचा रेडमी मोबाईल असे एकूण 73 हजारांचे चार मोबाईल फोन चोरट्याने चोरून नेले. चिखली (Chikhali ) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.