Wakad : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चॉपर, कोयत्याने (Wakad ) वार करत त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री अकरा वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

सुजल दीपक निकम (वय 20, रा. काळेवाडी, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चिन्या उर्फ प्रथमेश साळेकर, सुजल दातरे (वय 20), दीपक यादव (वय 19), दीप साळुंखे (वय 21), प्रेम दातरे (वय 22), राजेश उदमले, रित्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून सोहम जाधव याला ‘तू दीपक यादव याच्या बहिणीची छेड का काढली’ असा जाब विचारत होते. त्यानंतर आरोपींनी सोहम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता दीपक यादव याने फिर्यादीच्या मानेवर चॉपरने वार केला. तसेच प्रेम दातरे याने फिर्यादीच्या डोक्यात, गालावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

चिन्या याने फिर्यादीला पट्ट्याने मारहाण केली. तर सुजल, राजेश आणि रित्या यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सुजल, दीपक, दीप, प्रेम या चौघांना अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत (Wakad )आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.